Wednesday, March 4, 2020

कोरोना व्हायरस माहिती


                       कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस - चीनच्या वुहानपासून पसरण्यास सुरु झालेला कोरोना व्हायरस आता भारतापर्यंत येऊन पोहोचला आहे. भारतात कोरोनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेक लोकांनी सोशल मीडियावरील मेसेज वाचून नॉन-व्हेज खाणे सोडून दिले आहे. सध्या नॉन-व्हेज खाणे टाळा असे मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.
नॉन-व्हेज खाणे कितपत सुरक्षित ? -
सांगण्यात येत आहे की कोरोना व्हायरस वुहानच्या मांस विक्री बाजारातून (मीट मार्केट) पसरला होता. या मार्केटमध्ये चिकन, सी फूड, मीट, मेंढी, साप यासारख्या अनेक जनावरांच्या मांसाची विक्री होते. यामुळे भारतात देखील अफवा पसरत आहेत की नॉन-व्हेज खाल्ल्याने कोरोना व्हायरस पसरू शकतो.
लोकांचे म्हणणे आहे की व्हायरस जनावरांद्वारे लोकांपर्यंत पसरत आहे आणि यामुळे नॉन-व्हेज न खाण्याचा सल्ला दिला जात आहे. असे असले तरी याची अद्याप याची पुष्टी झालेली नाहीये की कोरोना जनावरांशी संबंधित आहे अथवा नाही. WHO ने देखील या अफवांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिलेला आहे.
भारतात नॉन-व्हेज खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे, फक्त हे पदार्थ नीट साफ करुन तयार करावेत. मांस कच्चे किंवा अर्धे शिजलेले नसावे. नॉन-व्हेज चांगले शिजवलेले असेल तर कोणतीही भीती नाही.
कोरोना बिअरमुळे पसरतो -
सोशल मीडियावर अशी अफवा आहे की लोकप्रिय बिअर ब्रॅंड 'कोरोना'मुळे कोरोना व्हायरस पसरत आहे. हा फक्त एक संयोग आहे की बिअर आणि व्हायरसचे नाव सारखे आहे. याचा व्हायरसशी काहीही संबंध नाही. लोक फक्त याच्या नावाने अफवा पसरवत आहेत.
एका अहवालानुसार, कोरोना बिअर ब्रॅंडमुळे या व्हायरसचे नाव बदलून BudLightVirus करण्याची मागणी केली होती. यासाठी 15 मिलियन डॉलरची ऑफर देखील दिली होती.
पाळीव जनावरांमुळे देखील होऊ शकतो कोरोना -
WHO नुसार अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की पाळीव जनावरामुळे कोरोना होतो, जसे की मांजर, कुत्र्यांना कोरोना झाला आहे आणि तो पसरला आहे.
वयोवृद्ध माणसं होत आहेत कोरोनाचे शिकार -
कोरोना लहान मुले, तरुण, पुरुष, महिला, वयोवृद्ध सर्वांनाच होऊ शकतो. असे असले तरी वयोवृद्ध माणसे याला लवकर बळी पडू शकतात, कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते.
कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबायोटिक्स पुरेशी आहे -
अँटीबायोटिक्स औषध या व्हायरसला रोखू शकत नाहीत. अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियल इंफेक्शन रोखू शकते. कोरोना असा आजार आहे जो रोखण्यासाठी कोणतेही औषधे अद्याप बाजारात नाहीत.


No comments:

Post a Comment

  Click on the name of chapter Life Procees in Living Organisms Part-2   Heredity and evolution Animal Classification Cell biology and biote...