असाही एक योगायोग
माझ्या वर्गातील 2017-18 या वर्षामध्ये इयत्ता सहावीत शिकणारी एक छोटीशी मुलगी हर्षदा मला म्हणाली ' सर ही पृथ्वी 2020 ला नष्ट होईल फार मोठं संकट या पृथ्वीवर येणार आहे' सर्व वर्गातले सर्व मुलं हसली मी पण हसलो आणि म्हणालो ठीक आहे बघू आपण 2020 ला. काय होतं तुझी भविष्यवाणी खरी ठरते की काय? आता ती मुलगी 2020 मध्ये ज्यावेळेस आठवी (ड) मध्ये शिकत आहे, जेव्हा जानेवारी महिना सुरू झाला त्यावेळेस मुलांनी आठवण करून दिली. मी तर विसरून गेलो होतो ती काय म्हणाली होती ते? परंतु सर्व मुलं म्हणाले 'ही मुलगी सहावीमध्ये आपल्याला पृथ्वीवर संकट येणार आहे असं म्हणाली होती' आता तिला विचारा . मी तिला विचारले 'काय कुठे गेली तुझी भविष्यवाणी'? तिला काय सांगावे कळलं नाही फक्त हसली व खाली बसली. आम्हाला जिंकल्यासारखा वाटले आणि काही दिवसातच आता बघा काय झाले ते, हा एक निव्वळ योगायोग होता की काय पण……….
डी.एस.पावरा
(आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताणे)
No comments:
Post a Comment