Saturday, August 15, 2020

आकाशवाणी

 डॉ. सु.लो. जाधव यांचे आकाशवाणी  केंद्रावारील भाषण 
👇लोगोवर क्लिक करा.

 

Friday, June 26, 2020

अभ्यास


                                      आता सर्व इयत्ता एकाच क्लिकवर  अभ्यासा,
                              परंतु थोड ओपोन होण्यास वेळ लागतो. 



Tuesday, June 9, 2020

वैज्ञानिक चाचणी

चला करूया पुन्हा एकदा वैज्ञानिक चाचणीला सुरुवात खालील चित्रावर क्लिक करा👇 आणि सुरू करा.🏃


https://testmoz.com/3844336

Monday, May 25, 2020

वैज्ञानिक चाचणी

वैज्ञानिक चाचणी सोडवण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.


Friday, May 22, 2020

सामान्यज्ञान चाचणी

तुमच्यासाठी आणखी एक सोपी प्रश्नपत्रिका सर्वांनी सोडवा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा.
सर्व नियम मागच्या प्रश्नपत्रिकेचे सारखेच आहेत.
टीप:-
विद्यार्थ्यांनी स्वतःचे पूर्ण नाव लिहावे मागच्या वेळेस काही विद्यार्थ्यांनी फक्त स्वतःचे नाव लिहिले होते.

फोटोवर क्लिक करा.



Monday, May 18, 2020

सामान्यज्ञान चाचणी


खालील चाचणी मधील प्रश्न पाच मिनिटाच्या आत सर्व बरोबर सोडवल्यास 101 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल.
सर्वांनी प्रयत्न करा आणि सोडवा. विद्यार्थी आदर्श विद्यामंदिर चा असावा आणि दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल.
एका विद्यार्थ्याला एकच वेळा परीक्षा देता येईल परीक्षेच्या पहिले पूर्ण नाव टाईप करणे गरजेचे आहे
त्याचबरोबर इयत्ता तुकडी नोंदवा.



शाळेच्या लोगोवर  क्लिक करा






Sunday, April 26, 2020

डॉक्टर सु.लो. जाधव यांचा लेख



 कोरोना साठी सामुदायिक लढा   

                                             संपूर्ण विश्वाला हादरवून सोडणारा आजार किंवा संसर्ग हा आदिवासी आणि ग्रामीण समाजाच्या तुलनेने शहरी समाजाला जास्त भेडसावत आहे मुळातच या आजाराचा प्रसार जास्त लोकसंख्या असणाऱ्या किंवा लोकसंख्येची घनता जास्त असणाऱ्या समुदायात अधिका अधिक प्रमाणात होत असतो आज भारतातील महानगरे या आजाराने अस्वस्थ झाली आहेत नेहमीच चैनीचे जीवन जगणारा नागरी समाज आज केवळ आपल्या मूलभूत गरजा कशा भागतील एवढाच प्रयत्न करू लागला आहे भौतिक संपत्ती संचय करून कुबेराचा धनी होणे किंवा श्रीमंतीचा कळस गाठण हा त्ज्यांचा नित्यक्रम होता ते नागरी समुदायातील लोक आज मात्र अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांकडे वळले आहेत सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मॅक्स लो यांनी सुरक्षा ही माणसाची प्रथम गरज सांगितली आहे माणूस सुरक्षित राहिला तर सर्वकाही प्राप्त करू शकतो मात्र जर तो असुरक्षित राहिला तर कोणत्याही भौतिक सुखाच्या मागे धावत नाही हे एक शाश्वत सत्य आहे आज कोरूना आजारात ही बाब पुन्हा एकदा सत्य ठरली आहे माझं ऐश्वर्य माझी संपत्ती माझा रुबाब किंवा माझं मोठेपण या बाबी आज नकोशा वाटू लागल्या आहेत केवळ मी मी सुरक्षित कसा राहील यासाठीच प्रत्येक व्यक्ती स्वतःला घरात बंदिस्त करून बसला आहे महाराष्ट्राचा केवळ विचार करता असे लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणी माणूस प्राथमिक स्वरूपाचे आणि पारंपारिक पद्धतीने जीवन जगत आहे अशा ठिकाणी कोणाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही महाराष्ट्रातील आदिवासी बहुल क्षेत्र कोरोना पासून आज तरी चार हात दूर आहेत भंडारा गडचिरोली नंदुरबार आणि महाराष्ट्राच्या इतर डोंगराळ प्रदेशात अजून कोरूना ने धडक मारली नाही कदाचित तो अशा ठिकाणी पोचणार देखील नाही कुपोषणाची व्यथा असणारा मेळघाट परिसर किंवा कोवळी पानगळ होणारा सातपुडा परिसर मनापासून लांब आहे यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आदिवासी समाजात असलेला स्वयम् शिस्तीचा नियम होय हा समाज पुढारलेल्या समाजापेक्षा सामाजिक नियम पाळण्यात अग्रेसर मानला जातो ज्यावेळेस सामाजिक सुरक्षेसाठी समाजाकडून व शासनाकडून आचार संहिता राखली जाते हा समाज तिचे तंतोतंत पालन करीत असतो नियम पाळण्यासाठी या समाजाला कोणीही ही त्रयस्थ व्यक्ती वा संस्था बळजबरी करीत नाही शिवाय वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाजार नावाच्या सुपर व्यवस्थेवरच अवलंबून राहणे या समाजाला पसंत नाही जे उपलब्ध आहे आपल्या जवळ आहे त्याच्या सहाय्याने आपण निर्वाह करू शकतो शिवाय निसर्गनिर्मित संसाधने मानवाला जीवन जगण्यास समर्थ असतात अशी धारणा या समाजाची नेहमीच राहिल्यामुळे अशा आजारांपासून आदिवासी समाज दूर आहे सामुदायिक संमतीने बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला वस्तीच्या बाहेर ठेवणे शिवाय बाहेरून येणारा व्यापारी विक्रेता किंवा फेरीवाला यांना प्रवेश देणे ह्या बाबी आदिवासी समाजाने स्वतःहून सुरू केल्या आजही हे नियम पाळले जात आहेत म्हणून हा समाज कोणाशी दोन हात करण्यासाठी नेहमीच सज्ज आहे इतर प्रगत विकसित किंवा पुढारलेल्या म्हणवल्या जाणाऱ्या सभासदांनी आदिवासी समाजाचा आदर्श घेणे खूप गरजेचे आहे 


                                                       डॉ. सु.लो. जाधव

Tuesday, April 14, 2020

फिरती प्रयोगशाळा

TeaTeaching Resources,

 Activities, and Communityching Resources, Activities, and Community

Sunday, March 29, 2020

योगायोग

                असाही एक योगायोग
माझ्या वर्गातील 2017-18 या वर्षामध्ये इयत्ता सहावीत शिकणारी एक छोटीशी मुलगी हर्षदा मला म्हणाली ' सर ही पृथ्वी 2020 ला नष्ट होईल फार मोठं संकट या पृथ्वीवर येणार आहे' सर्व वर्गातले सर्व मुलं हसली मी पण हसलो आणि म्हणालो ठीक आहे बघू आपण 2020 ला. काय होतं तुझी भविष्यवाणी खरी ठरते की काय? आता ती मुलगी 2020 मध्ये ज्यावेळेस आठवी (ड) मध्ये शिकत आहे, जेव्हा जानेवारी महिना सुरू झाला त्यावेळेस मुलांनी आठवण करून दिली. मी तर विसरून गेलो होतो ती काय म्हणाली होती ते? परंतु सर्व मुलं म्हणाले 'ही मुलगी सहावीमध्ये आपल्याला पृथ्वीवर संकट येणार आहे असं म्हणाली होती' आता तिला विचारा . मी तिला विचारले  'काय कुठे गेली तुझी भविष्यवाणी'? तिला काय सांगावे कळलं नाही फक्त हसली व खाली बसली. आम्हाला जिंकल्यासारखा वाटले आणि काही दिवसातच आता बघा काय झाले ते, हा एक निव्वळ योगायोग होता की काय पण……….



                     डी.एस.पावरा
       (आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताणे)

Wednesday, March 4, 2020

कोरोना व्हायरस माहिती


                       कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस - चीनच्या वुहानपासून पसरण्यास सुरु झालेला कोरोना व्हायरस आता भारतापर्यंत येऊन पोहोचला आहे. भारतात कोरोनाचे 28 रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसच्या भीतीने अनेक लोकांनी सोशल मीडियावरील मेसेज वाचून नॉन-व्हेज खाणे सोडून दिले आहे. सध्या नॉन-व्हेज खाणे टाळा असे मेसेज सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत.
नॉन-व्हेज खाणे कितपत सुरक्षित ? -
सांगण्यात येत आहे की कोरोना व्हायरस वुहानच्या मांस विक्री बाजारातून (मीट मार्केट) पसरला होता. या मार्केटमध्ये चिकन, सी फूड, मीट, मेंढी, साप यासारख्या अनेक जनावरांच्या मांसाची विक्री होते. यामुळे भारतात देखील अफवा पसरत आहेत की नॉन-व्हेज खाल्ल्याने कोरोना व्हायरस पसरू शकतो.
लोकांचे म्हणणे आहे की व्हायरस जनावरांद्वारे लोकांपर्यंत पसरत आहे आणि यामुळे नॉन-व्हेज न खाण्याचा सल्ला दिला जात आहे. असे असले तरी याची अद्याप याची पुष्टी झालेली नाहीये की कोरोना जनावरांशी संबंधित आहे अथवा नाही. WHO ने देखील या अफवांकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिलेला आहे.
भारतात नॉन-व्हेज खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे, फक्त हे पदार्थ नीट साफ करुन तयार करावेत. मांस कच्चे किंवा अर्धे शिजलेले नसावे. नॉन-व्हेज चांगले शिजवलेले असेल तर कोणतीही भीती नाही.
कोरोना बिअरमुळे पसरतो -
सोशल मीडियावर अशी अफवा आहे की लोकप्रिय बिअर ब्रॅंड 'कोरोना'मुळे कोरोना व्हायरस पसरत आहे. हा फक्त एक संयोग आहे की बिअर आणि व्हायरसचे नाव सारखे आहे. याचा व्हायरसशी काहीही संबंध नाही. लोक फक्त याच्या नावाने अफवा पसरवत आहेत.
एका अहवालानुसार, कोरोना बिअर ब्रॅंडमुळे या व्हायरसचे नाव बदलून BudLightVirus करण्याची मागणी केली होती. यासाठी 15 मिलियन डॉलरची ऑफर देखील दिली होती.
पाळीव जनावरांमुळे देखील होऊ शकतो कोरोना -
WHO नुसार अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की पाळीव जनावरामुळे कोरोना होतो, जसे की मांजर, कुत्र्यांना कोरोना झाला आहे आणि तो पसरला आहे.
वयोवृद्ध माणसं होत आहेत कोरोनाचे शिकार -
कोरोना लहान मुले, तरुण, पुरुष, महिला, वयोवृद्ध सर्वांनाच होऊ शकतो. असे असले तरी वयोवृद्ध माणसे याला लवकर बळी पडू शकतात, कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते.
कोरोनाला रोखण्यासाठी अँटीबायोटिक्स पुरेशी आहे -
अँटीबायोटिक्स औषध या व्हायरसला रोखू शकत नाहीत. अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियल इंफेक्शन रोखू शकते. कोरोना असा आजार आहे जो रोखण्यासाठी कोणतेही औषधे अद्याप बाजारात नाहीत.


Wednesday, February 19, 2020

विद्यार्थी विकास मंच

पुलाचे परीक्षणावेळी उपस्थित मान्यवर














Saturday, February 1, 2020

बक्षीस समारंभ


काही फोटो येथे दिसत नाही ते तुम्हाला खेळ या नावावर क्लिक केल्यावर दिसतील.

बक्षीस समारंभ






बक्षीस वितरण समारंभ आणि आमचे रत्न या पुस्तकाचे प्रकाशन आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताणे - 2020






























  Click on the name of chapter Life Procees in Living Organisms Part-2   Heredity and evolution Animal Classification Cell biology and biote...