* ‘यशाचा ' मार्ग-
माझी शाळा ‘ *
मी शिक्षण घेणारा
एक सामान्य विद्यार्थी आहे .मी धुळे जिल्ह्यातल्या निजामपुर-जैताणे या गावातला
रहिवासी. मी सध्या आठवी इयत्तेत शिकतो. मी माझ्या गावातल्या 'आदर्श विद्या मंदिर ' या शाळेत शिकतो. मी माझ्या शाळेला मंदिर म्हणून, घर म्हणून, की यशाचा मार्ग म्हणून? आमच्या आदर्श विद्या मंदिरात पाचवी ते दहावी हे
माध्यमिक शिक्षण दिले जाते .आमच्या शाळेच्या बाजूला 'आदर्श प्राथमिक विद्या मंदिर' येथे पहिली ते चौथी चे प्राथमिक शिक्षण दिले
जाते .माझ्या शाळेतील शिक्षकही अतिशय चांगल्या पद्धतीने व मनापासून आम्हाला
शिकवतात.
मला याच वर्षी 'डी. एस. पावरा ' सर हे वर्गशिक्षक म्हणून लाभलेत. हे आम्हाला विज्ञान शिकवता. मी तर त्यांना
माझे विशेष मार्गदर्शक मानतो .मला काही विज्ञानाविषयी प्रश्न अडला की मी त्या
सरांकडेच जातो कारण त्यांचं सांगणं, त्यांचे हावभाव हे मला मोहून टाकतात. एखाद्यावेळेस सर आम्हाला भरपूर हसवतातही.
आमचे हे सर डिजिटल रूमही चालवता. पावरा सर हे माझ्या आवडत्या शिक्षकांपैकी एक आहे.
आमचे गणित शिक्षक 'पी. एच. जाधव' सर यांना तर मी गणिताचा तज्ञच म्हणेल. त्यांना कोणतेही गणित कोणत्याही वेळेला
द्या ते त्याला सोडायला तयारच राहतील.सरांना तर मी गणिताचे जादूगर ही म्हणेल. सर
जेव्हा एखादे गणित सोडवतात तेव्हा मी फक्त तेथे बघतच राहावे. मला जसे सरांचे गणित
सोडवणे मोहात पाडते तसेच सरांना गणित मोहात पाडते.माझ्या शाळेतील सर्व शिक्षक असेच
हुशार व तरबेज आहेत.
माझ्या शाळेत विविध कार्यक्रम राबवले जातात, जसे की वृक्षदिंडी, मतदान जागृती विषयक कार्यक्रम, विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवले जातात. नुकताच आमच्या शाळेत
दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्यात विविध नाटके, भाषणे इत्यादी सादर करण्यात आले. त्यात माझाही
सहभाग होता. माझ्या शाळेत एकदम चांगले व अत्याधुनिक शिक्षण दिले जाते. मला माझी
शाळा खूप आवडते. माझ्या शाळेबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. मला माझ्या शाळेवर
अभिमान आहे. मी माझ्या शाळेचा सदैव ऋणी राहीन…
- यश प्रवीण राणे
No comments:
Post a Comment