माझी लेक माझा अभिमान…..
अशी एक लेक देवा माझ्या पोटी येते
नाव सुद्धा ती इथेच सोडून जाते
पहिला घास देवा ती माझ्या हातून खाते
माझा हात धरून ती पहिला पाऊल टाकते
माझ्याकडून ती पहिले अक्षर लिहायला शिकते
तिच्यासाठी मी रात्र रात्र जागतो
कुशीत माझ्या झोपण्यासाठी गाल फुगवून
मी आणलेला फ्रॉक घालून घरभर नाचते
अशी एक लेख देवा माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे तिचे माझे नाते
एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते
बाबा तुम्ही दमलात का हळूच मला विचारते
माझ्या घरातली लक्ष्मी एक दिवस
दुसऱ्याच्या घरातील गृहलक्ष्मी होते .
माझ्यासाठी तिच्या आईला विचारते
आई माझ्या बाबांनी जेवण केलं का?
माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते
नव्या जगातली नव्या गोष्टी मला ती सांगते .
तिच्या दूर जाण्याने होतो मी कातर
नंतर हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते.
कळत नाही मला देवा असे कसे होते
कधी जागा बदलून ती माझ्या आईचं होते
देव म्हणाला एक पोरी तुझे तिचे नाते
विश्वासाच्या साखळीची एक कळी असते.
तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते.
सावली आणि सुगंध आशिल तुझेच नाव असते.
वाहणाऱ्या प्रवाहाला कोणी कधी मोठी धरलं नाही
मार्ग आहे ज्याचा त्याचा कुठे जायचे असते
तुझ्या अंगणातील धारा ही जीवनदानी होते
आणि वाहती राहण्यासाठी गंगा सागराला मिळते
एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना न्याहाळयला मिळाली
एक तरी मुलगी असावी उमलतांना बघावी
तीने नाचण्यातही गंमत शिकवावी
एक तरी मुलगी असावी जवळ घेऊन असावी
मनातली गुपितं हळूच माझ्या कानात सांगावी
बघा माझ्या मायबापांना कशी असते
आपण तिला कधीही कमी समजू नये
जर कधी आज मुलीचे प्रेम राहिले नसते
तर सर्वात जास्त जगात वृद्धाश्रम राहिले असते.
मुली नकोशा होत्या साऱ्या …..
हव्या हव्याशा झाल्या….
बरे झाले भारतात…..
मुली जन्माला आल्या...
ज्यांना लाज आम्ही….
वेशीवर टांगली …..
जागतिक पातळीवर ….
त्यांनीच राखली लाज ...
त्यांचेच उपकार ….
ध्यानी मनी राहु द्या…..
घराघरात आता ...
मुली जन्माला येऊ द्या…..

कृष्णा वासुदेव खैरनार
(खुडाणे)
No comments:
Post a Comment