आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,निजामपुर-जैताणे.
Wednesday, October 30, 2019
Saturday, October 26, 2019
Thursday, October 17, 2019
लढा डेंग्यूशी
लढा
डेंग्यूशी !
पावसाळ्यात केवळ एक सुखद हवामानच नसते तर या हंगामात डेंग्यू, मलेरिया डास सर्वाधिक आढळतात.डेंग्यू, मलेरिया हा मादी डासांच्या चाव्याव्दारे एक आजार आहे. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू बर्याचदा वेळा होऊ शकतो.हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात. कोणत्याही वेळी चावू शकतो. अशा परिस्थितीत डेंग्यूची लक्षणे, बचाव आणि उपचारांविषयी योग्य माहिती असणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून आपण या संसर्गापासून आपल्या कुटुंबास आणि स्वत: ला सांगू शकाल.
लक्षणे
डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तीव्र सर्दी, डोकेदुखी, डोळ्यांमध्ये
वेदना आणि डोळ्यातील तीव्र वेदना यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्याला सतत तीव्र
ताप आहे. याशिवाय सांधेदुखी, अस्वस्थता, उलट्या, कमी रक्तदाब
यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
उपचार
डेंग्यू हा विषाणूमुळे झाल्यामुळे डेंग्यू विषाणूचे डेन-1, डेन-2, डेन-3 व डेन-4 त्यावर कोणत्याही प्रकारे लवकर उपचार करणे शक्य
नाही. डेंग्यूची लक्षणे लक्षात घेत आरामात उपचार केले जातात. अशा परिस्थितीत, ही लक्षणे ओळखून, त्या व्यक्तीने
विलंब न करता डॉक्टरांना भेटले पाहिजे आणि त्यावर उपचार करावेत. या दरम्यान, जास्तीत जास्त पाणी पिण्याने संपूर्ण विश्रांती
घेणे आवश्यक आहे.
डेंग्यूच्या उपचारांना उशीर झाल्यास तो डेंग्यू हेमोरॅजिक
फिव्हर (डीएचएफ) चे रूप धारण करतो जो अधिक भयानक असू शकतो. दहा वर्षापेक्षा कमी
वयाच्या मुलांमध्ये तीव्र ओटीपोटात दुखणे, रक्तस्त्राव होणे
आणि धक्का बसणे बहुधा डीएचएफ होण्याची शक्यता असते.
प्रतिबंधात्मक उपाय
सध्या डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध
नसल्याने, त्याचे संरक्षण करण्यासाठी आपली जागरूकता अधिक
महत्त्वाची ठरली आहे. डेंग्यू विषाणूस डासांचा संसर्ग आहे, म्हणूनच डासांना घरी पैदास होऊ नये ही सर्वात
महत्त्वाची बाब आहे. स्वच्छता खूप महत्वाची आहे कारण घाणीत डेंग्यूची डास होण्याची
शक्यता वाढते. नेहमी बादल्या आणि ड्रममध्ये साचलेले पाणी झाकून ठेवा आणि
आजूबाजूच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका.
खबरदारी घ्या-
- थंड पाणी पिण्यास थांबवा. तसेच, मैदा आणि शिळे
अन्न खाऊ नका.
फळभाजी,हळद, आले, हिंग शक्य
तितक्या प्रमाणात वापरा.
या हंगामात पालेभाज्या, फुलकोबी खाणे टाळा.
हलके अन्न खा, जे सहज पचले जाऊ शकते.
- संपूर्ण झोप घ्या, भरपूर पाणी प्या आणि पाणी
उकळा.
-मसाले आणि तळलेले पदार्थ खाऊ नका, उपासमारीपेक्षा
कमी खाऊ नका, जास्त प्रमाणात खाऊ नका.
- भरपूर पाणी प्या. भरपूर ताक, नारळपाणी, लिंबाचे पाणी इ.
डेंग्यू चाचणी-
जर एखाद्या व्यक्तीस ताप, तीव्र सांधेदुखी
आणि शरीरावर पुरळ दिसली तर डेंग्यूची तपासणी त्वरित करवून घ्या. सुरुवातीला रक्त
तपासणी (एनएस 1) डेंग्यूची तपासणी करण्यासाठी केली जाते. या चाचणीत सुरुवातीला
डेंग्यू अधिक सकारात्मक होते, तर नंतर हळूहळू सकारात्मकता कमी होण्यास सुरवात
होते. ही चाचणी सुमारे 1000 ते 1500 रुपये आहे. जर तीन ते चार दिवसांनी चाचणी केली
तर अँटीबॉडी चाचणी करणे (डेंग्यू सिरॉलॉजी) करणे चांगले. यासाठी 600 ते 1500 रुपये
आकारले जातात. डेंग्यूची तपासणी करत असताना पांढरया रक्त पेशींची एकूण मोजणी आणि
भिन्न गणना केली पाहिजे. या चाचणीमध्ये प्लेटलेटची संख्या ज्ञात आहे. बहुतेक
रुग्णालये आणि लॅबमध्ये डेंग्यूची चाचणी घेतली जाते. चाचणी अहवाल 24 तासात
पोहोचतो. चांगले लॅबसुद्धा दोन ते तीन तासांत रिपोर्ट करतात. उपाशी किंवा जेवण
करून या चाचण्या केल्या जाऊ शकतात.
Wednesday, October 16, 2019
Thursday, October 10, 2019
Wednesday, October 9, 2019
सावधान
ब्लॉगचा वापर करणाऱ्यांना सुचित करण्यात येते की आम्ही कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्याकडून घेत नाहीत, तसेच तुमची प्रायव्हेट माहिती कोणालाही देऊ नका जसे जन्मतारीख, बँक अकाउंट नंबर, CVV नंबर इत्यादी.
Monday, October 7, 2019
Saturday, October 5, 2019
आदर्श विद्या मंदिर
आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर जैताणे
निजामपुर जैताणे हे गाव ग्रामीण भागातील वसलेले आहे. आजच्या 62 वर्षांपूर्वी या भागात शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती आपल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी हा उदात्त दृष्टिकोन ठेवून कै. विष्णुदास रामदास शाह व कै. जगन्नाथ कडवादास शाह यांनी गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तींना एकत्रित करून गावात शाळा सुरू करण्याचे ठरवले 21 जून 1957 रोजी निजामपूर जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर ची स्थापना केली संस्थेचे बोधवाक्य तमसो मा ज्योतिर्गमय हे ठरविले याचा अर्थ अंधाराकडून प्रकाशाकडे अर्थात अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याची वाटचाल सुरू केली. 1957 साली 90 विद्यार्थी संख्याने शाळेचा विकास सुरू केला. शाळेला जागेची कमतरता जाणवू लागली तेव्हा जैताणे ग्रामपंचायतीने पाच एकर जागा दिली त्या वेळेच्या संचालक मंडळाने मोठ्या देणग्या देऊन वर्ग खोल्या बांधल्या निस्वार्थ भावनेने स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर जाऊन पोहोचली आहे.
संस्थेने सुरुवातीस केवळ माध्यमिक विभाग सुरू केला नंतर कनिष्ठ महाविद्यालयाची भर टाकण्यात आली 1995 साली आदर्श कला महाविद्यालयाची स्थापना करून या ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय करून दिली नंतर 2003 साली आदर्श प्राथमिक विद्यामंदिर सुरू केले बदलत्या काळानुसार इंग्रजी माध्यमाची सुद्धा सोय 2012 साली करण्यात आली.
आज संस्थेचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक ,इंग्लिश मीडियम, माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभाग किमान कौशल्य, टेक्निकल, वरिष्ठ महाविद्यालय हे विभाग सुरू आहेत संस्थेचे संकुल भव्य व अनेक सोयींनी सुसज्ज आहे आज संस्थेत सुसज्ज प्रयोगशाळा कार्यशाळा ग्रंथालयाची भव्य वास्तू, संगणक कक्ष, टेक्निकल दालन, सुसज्ज क्रीडा विभाग, संगणीकरणानेयुक्त आधुनिक कार्यालय, सीसीटीव्ही कॅमेरे, भव्य पटांगण, एनसीसी विभाग, स्काऊट गाईड विभाग, विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनी साठी स्वतंत्र प्रसाधनगृह, विद्यार्थी वाचन कक्ष, शिक्षक दालन, वाहनतळ व अगदी आधुनिकते प्रमाणे शिक्षण देण्यासाठी सुसज्ज डिजिटल लॅब या सर्व सोयी संस्थेने करून दिल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून एसएससी एचएससी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी कायम राखली आहे यावर्षी एसएससी ला 331 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये 80 विद्यार्थी फर्स्टक्लास 140 विद्यार्थी एकूण 290 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल 87.87% प्रथम क्रमांक कुमारी दिपाली सुरेश शिरोळे 90.8 टक्के द्वितीय क्रमांक कुमारी रश्मी प्रदीप वाणी 90.40% तृतीय क्रमांक कुमारी प्रांजली प्रमोद राणे 89.80
इयत्ता बारावी मध्ये 375 विद्यार्थी परीक्षेला बसले 356 विद्यार्थी उत्तीर्ण 94.3 93 कला शाखेत 126 पैकी 110 विद्यार्थी पास झाले. प्रथम क्रमांक कारंडे पवन अर्जुन 80.15 टक्के किमान शाखेत 188 पैकी 185 विद्यार्थी पास झालेत प्रथम क्रमांक ठाकरे ऋषिकेश रामदास 82.76 % वाणिज्य शाखेत 61 पैकी 61 विद्यार्थी पास झालेत प्रथम क्रमांक कुमारी जाधव मोनाली संभाजी 79.07 तसेच विविध स्पर्धात्मक शासकीय परीक्षांमध्ये शाळेचा मोठा सहभाग असतो त्यात एन. एम. एम. एस. परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, संगीत परीक्षा,चित्रकला परीक्षा, यामध्ये शाळेला दरवर्षी चांगले यश मिळते तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दरवर्षी शाळेला पारितोषिक प्राप्त होतो जिल्हा स्तरापर्यंत विद्यार्थी तसेच शालेय शिक्षणाबरोबर सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुसंस्कार रुजवण्यासाठी महापुरुषांची जयंती पुण्यतिथी, साने गुरुजी,कथामाला, निबंध लेखन, कथालेखन स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, चित्रकला, हस्ताक्षर, सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा घेतल्या जातात तसेच सहलीचे नियोजन करून ऐतिहासिक व पर्यावरणीय ज्ञानात भर टाकली जाते स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो तसेच दरवर्षी आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो तसेच स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या दिवशी विविध लोककला लोकनृत्य टिपरी लेझीम नाटिका यांचे आयोजन करून संस्कृती जोपासण्याचे कार्य ही केले जाते तसेच मागील वर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी जिल्हास्तर विभागीय स्तर राज्यस्तर तसेच राष्ट्रीय पातळीपर्यंत यशस्वी झालेत चित्रकला परीक्षेच्या माध्यमातून या वर्षी इयत्ता दहावी मध्ये 60 विद्यार्थ्यांना वाली गुणांचा लाभ झाला.
तसेच दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच स्वच्छता अभियान असे उपक्रम घेतले जातात इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतच अभ्यासिका वर्गाची ही व्यवस्था करण्यात आली इयत्ता अकरावी बारावी साठी संगणक इलेक्ट्रॉनिक यासारखे विनाअनुदानित वर्ग संस्थेने सुरू केले आहेत. संस्थेने विद्यार्थी विकास मंचाची स्थापना केली आहे या माध्यमातून विविध यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. आपल्या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये आपल्या शिक्षणाची छाप पाडीत आहेत आयटी क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात बँकींग पोलीस क्षेत्रात आपल्या शाळेचे नाव उज्वल करीत आहेत तसेच ऋण म्हणून अनेक माजी विद्यार्थी शाळेला वेळोवेळी देणग्या पाठवीत असतात अनेक विद्यार्थी विदेशात ही आपली छाप पाडत आहेत आज आपल्या आदर्श संकुलांमध्ये चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संस्थापक संचालक मंडळापासून निस्वार्थ भावनेची प्रेरणा घेऊन वर्तमान संचालक मंडळानेही शिक्षणाचे बाजारीकरण होऊ दिले नाही हे विशेष उल्लेखनीय आहे.
श्री. राजेश शहा
(आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताणे)
यशाचा ' मार्ग- माझी शाळा
* ‘यशाचा ' मार्ग-
माझी शाळा ‘ *
मी शिक्षण घेणारा
एक सामान्य विद्यार्थी आहे .मी धुळे जिल्ह्यातल्या निजामपुर-जैताणे या गावातला
रहिवासी. मी सध्या आठवी इयत्तेत शिकतो. मी माझ्या गावातल्या 'आदर्श विद्या मंदिर ' या शाळेत शिकतो. मी माझ्या शाळेला मंदिर म्हणून, घर म्हणून, की यशाचा मार्ग म्हणून? आमच्या आदर्श विद्या मंदिरात पाचवी ते दहावी हे
माध्यमिक शिक्षण दिले जाते .आमच्या शाळेच्या बाजूला 'आदर्श प्राथमिक विद्या मंदिर' येथे पहिली ते चौथी चे प्राथमिक शिक्षण दिले
जाते .माझ्या शाळेतील शिक्षकही अतिशय चांगल्या पद्धतीने व मनापासून आम्हाला
शिकवतात.
मला याच वर्षी 'डी. एस. पावरा ' सर हे वर्गशिक्षक म्हणून लाभलेत. हे आम्हाला विज्ञान शिकवता. मी तर त्यांना
माझे विशेष मार्गदर्शक मानतो .मला काही विज्ञानाविषयी प्रश्न अडला की मी त्या
सरांकडेच जातो कारण त्यांचं सांगणं, त्यांचे हावभाव हे मला मोहून टाकतात. एखाद्यावेळेस सर आम्हाला भरपूर हसवतातही.
आमचे हे सर डिजिटल रूमही चालवता. पावरा सर हे माझ्या आवडत्या शिक्षकांपैकी एक आहे.
आमचे गणित शिक्षक 'पी. एच. जाधव' सर यांना तर मी गणिताचा तज्ञच म्हणेल. त्यांना कोणतेही गणित कोणत्याही वेळेला
द्या ते त्याला सोडायला तयारच राहतील.सरांना तर मी गणिताचे जादूगर ही म्हणेल. सर
जेव्हा एखादे गणित सोडवतात तेव्हा मी फक्त तेथे बघतच राहावे. मला जसे सरांचे गणित
सोडवणे मोहात पाडते तसेच सरांना गणित मोहात पाडते.माझ्या शाळेतील सर्व शिक्षक असेच
हुशार व तरबेज आहेत.
माझ्या शाळेत विविध कार्यक्रम राबवले जातात, जसे की वृक्षदिंडी, मतदान जागृती विषयक कार्यक्रम, विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवले जातात. नुकताच आमच्या शाळेत
दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी करण्यात आली. त्यात विविध नाटके, भाषणे इत्यादी सादर करण्यात आले. त्यात माझाही
सहभाग होता. माझ्या शाळेत एकदम चांगले व अत्याधुनिक शिक्षण दिले जाते. मला माझी
शाळा खूप आवडते. माझ्या शाळेबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. मला माझ्या शाळेवर
अभिमान आहे. मी माझ्या शाळेचा सदैव ऋणी राहीन…
- यश प्रवीण राणे
माझी लेक माझा अभिमान
माझी लेक माझा अभिमान…..
अशी एक लेक देवा माझ्या पोटी येते
नाव सुद्धा ती इथेच सोडून जाते
पहिला घास देवा ती माझ्या हातून खाते
माझा हात धरून ती पहिला पाऊल टाकते
माझ्याकडून ती पहिले अक्षर लिहायला शिकते
तिच्यासाठी मी रात्र रात्र जागतो
कुशीत माझ्या झोपण्यासाठी गाल फुगवून
मी आणलेला फ्रॉक घालून घरभर नाचते
अशी एक लेख देवा माझ्या पोटी येते
असे कसे वेगळे तिचे माझे नाते
एक दिवस अचानक ती मोठी होऊन जाते
बाबा तुम्ही दमलात का हळूच मला विचारते
माझ्या घरातली लक्ष्मी एक दिवस
दुसऱ्याच्या घरातील गृहलक्ष्मी होते .
माझ्यासाठी तिच्या आईला विचारते
आई माझ्या बाबांनी जेवण केलं का?
माझ्यासाठी कपडे चप्पल खाऊ घेऊन येते
नव्या जगातली नव्या गोष्टी मला ती सांगते .
तिच्या दूर जाण्याने होतो मी कातर
नंतर हळूच हसून मला ती कुशीत घेऊन बसते.
कळत नाही मला देवा असे कसे होते
कधी जागा बदलून ती माझ्या आईचं होते
देव म्हणाला एक पोरी तुझे तिचे नाते
विश्वासाच्या साखळीची एक कळी असते.
तुझ्या दारी फुलण्यासाठी हे रोप दिले असते.
सावली आणि सुगंध आशिल तुझेच नाव असते.
वाहणाऱ्या प्रवाहाला कोणी कधी मोठी धरलं नाही
मार्ग आहे ज्याचा त्याचा कुठे जायचे असते
तुझ्या अंगणातील धारा ही जीवनदानी होते
आणि वाहती राहण्यासाठी गंगा सागराला मिळते
एक तरी मुलगी असावी उमलताना बघावी
नाजूक नखरे करताना न्याहाळयला मिळाली
एक तरी मुलगी असावी उमलतांना बघावी
तीने नाचण्यातही गंमत शिकवावी
एक तरी मुलगी असावी जवळ घेऊन असावी
मनातली गुपितं हळूच माझ्या कानात सांगावी
बघा माझ्या मायबापांना कशी असते
आपण तिला कधीही कमी समजू नये
जर कधी आज मुलीचे प्रेम राहिले नसते
तर सर्वात जास्त जगात वृद्धाश्रम राहिले असते.
मुली नकोशा होत्या साऱ्या …..
हव्या हव्याशा झाल्या….
बरे झाले भारतात…..
मुली जन्माला आल्या...
ज्यांना लाज आम्ही….
वेशीवर टांगली …..
जागतिक पातळीवर ….
त्यांनीच राखली लाज ...
त्यांचेच उपकार ….
ध्यानी मनी राहु द्या…..
घराघरात आता ...
मुली जन्माला येऊ द्या…..

कृष्णा वासुदेव खैरनार
(खुडाणे)
Friday, October 4, 2019
Contact Us
Contact Us
Dharamdas pawara
Mob.No. 9373005358
Email:-dharamdas1980@gmail.com
Pankaj Jadhav
Mob.No.9890284688
Email:-pankajjadhav1971@gmail.com
Dharamdas pawara
Mob.No. 9373005358
Email:-dharamdas1980@gmail.com
Pankaj Jadhav
Mob.No.9890284688
Email:-pankajjadhav1971@gmail.com
Wednesday, October 2, 2019
Subscribe to:
Posts (Atom)
Click on the name of chapter Life Procees in Living Organisms Part-2 Heredity and evolution Animal Classification Cell biology and biote...
-
बक्षीस वितरण समारंभ आणि आमचे रत्न या पुस्तकाचे प्रकाशन आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताणे - 2020 ...
-
आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर जैताणे निजामपुर जैताणे हे गाव ग्रामीण भागातील वसलेले आहे...