Wednesday, November 27, 2019
भारताचा आणखी एक इतिहास, कार्टोसॅट -3 यशस्वीरित्या लाँच
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) पीएसएलव्ही-सी ४७ ला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून कार्टोसॅट - ३ सह १३ यूएस नॅनो उपग्रह प्रक्षेपित केले. भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता हे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी इस्रो चेअरमन यांच्यासमवेत इस्त्रोचे सर्व वैज्ञानिक व कर्मचारी उपस्थित होते.
सीमेवर शत्रूचे बारकाईने निरीक्षण केले जाईल
कार्टोसॅट -३ च्या माध्यमातून , सीमा ओलांडून आणि सीमेपलिकडे नजर ठेवता येणार आहे. यामुळे सीमापार शत्रूच्या कोणत्याही धोकादायक हेतूंचे परीक्षण केले जाऊ शकेल आणि नैसर्गिक आपत्तींविषयी अचूक माहिती देखील मिळू शकेल. त्यात असलेला कॅमेरा इतका शक्तिशाली आहे की त्याद्वारे ५९० किमी उंचीवरून एखाद्याच्या घड्याळाचा काटाही दिसू शकतो.
कार्टोसेट - ३ पाच वर्षे काम करेल
कार्टोसॅट - ३ हा तिसर्या पिढीचा अत्यंत चपळ आणि प्रगत उपग्रह आहे , ज्यात हाय रिझोल्यूशन छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. त्याचे वजन १,६२५ किलो आहे. तर कार्टोसॅट - ३ पाच वर्ष काम करेल असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment