कोरोना साठी सामुदायिक लढा
संपूर्ण विश्वाला हादरवून सोडणारा आजार किंवा संसर्ग हा आदिवासी आणि ग्रामीण समाजाच्या तुलनेने शहरी समाजाला जास्त भेडसावत आहे मुळातच या आजाराचा प्रसार जास्त लोकसंख्या असणाऱ्या किंवा लोकसंख्येची घनता जास्त असणाऱ्या समुदायात अधिका अधिक प्रमाणात होत असतो आज भारतातील महानगरे या आजाराने अस्वस्थ झाली आहेत नेहमीच चैनीचे जीवन जगणारा नागरी समाज आज केवळ आपल्या मूलभूत गरजा कशा भागतील एवढाच प्रयत्न करू लागला आहे भौतिक संपत्ती संचय करून कुबेराचा धनी होणे किंवा श्रीमंतीचा कळस गाठण हा त्ज्यांचा नित्यक्रम होता ते नागरी समुदायातील लोक आज मात्र अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांकडे वळले आहेत सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मॅक्स लो यांनी सुरक्षा ही माणसाची प्रथम गरज सांगितली आहे माणूस सुरक्षित राहिला तर सर्वकाही प्राप्त करू शकतो मात्र जर तो असुरक्षित राहिला तर कोणत्याही भौतिक सुखाच्या मागे धावत नाही हे एक शाश्वत सत्य आहे आज कोरूना आजारात ही बाब पुन्हा एकदा सत्य ठरली आहे माझं ऐश्वर्य माझी संपत्ती माझा रुबाब किंवा माझं मोठेपण या बाबी आज नकोशा वाटू लागल्या आहेत केवळ मी मी सुरक्षित कसा राहील यासाठीच प्रत्येक व्यक्ती स्वतःला घरात बंदिस्त करून बसला आहे महाराष्ट्राचा केवळ विचार करता असे लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणी माणूस प्राथमिक स्वरूपाचे आणि पारंपारिक पद्धतीने जीवन जगत आहे अशा ठिकाणी कोणाचा प्रादुर्भाव आढळून येत नाही महाराष्ट्रातील आदिवासी बहुल क्षेत्र कोरोना पासून आज तरी चार हात दूर आहेत भंडारा गडचिरोली नंदुरबार आणि महाराष्ट्राच्या इतर डोंगराळ प्रदेशात अजून कोरूना ने धडक मारली नाही कदाचित तो अशा ठिकाणी पोचणार देखील नाही कुपोषणाची व्यथा असणारा मेळघाट परिसर किंवा कोवळी पानगळ होणारा सातपुडा परिसर मनापासून लांब आहे यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आदिवासी समाजात असलेला स्वयम् शिस्तीचा नियम होय हा समाज पुढारलेल्या समाजापेक्षा सामाजिक नियम पाळण्यात अग्रेसर मानला जातो ज्यावेळेस सामाजिक सुरक्षेसाठी समाजाकडून व शासनाकडून आचार संहिता राखली जाते हा समाज तिचे तंतोतंत पालन करीत असतो नियम पाळण्यासाठी या समाजाला कोणीही ही त्रयस्थ व्यक्ती वा संस्था बळजबरी करीत नाही शिवाय वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाजार नावाच्या सुपर व्यवस्थेवरच अवलंबून राहणे या समाजाला पसंत नाही जे उपलब्ध आहे आपल्या जवळ आहे त्याच्या सहाय्याने आपण निर्वाह करू शकतो शिवाय निसर्गनिर्मित संसाधने मानवाला जीवन जगण्यास समर्थ असतात अशी धारणा या समाजाची नेहमीच राहिल्यामुळे अशा आजारांपासून आदिवासी समाज दूर आहे सामुदायिक संमतीने बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला वस्तीच्या बाहेर ठेवणे शिवाय बाहेरून येणारा व्यापारी विक्रेता किंवा फेरीवाला यांना प्रवेश देणे ह्या बाबी आदिवासी समाजाने स्वतःहून सुरू केल्या आजही हे नियम पाळले जात आहेत म्हणून हा समाज कोणाशी दोन हात करण्यासाठी नेहमीच सज्ज आहे इतर प्रगत विकसित किंवा पुढारलेल्या म्हणवल्या जाणाऱ्या सभासदांनी आदिवासी समाजाचा आदर्श घेणे खूप गरजेचे आहे
डॉ. सु.लो. जाधव